टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
“स्त्री पुरूष समानता” हा शब्द वापरून गुळगुळीत झाला आहे. त्याचा फ़ुले-आंबेडकरांना अभिप्रेत असलेला अर्थ सुद्धा बदलत चालला आहे. ३३ % च्या राजकारणाने तर स्त्रीया सरपंच ( बिहारच्या रूपाने मुख्यमंत्रीसुद्धा ! ) आणि सत्तेची सगळी सूत्रे बैलोबाकडे असे सुद्धा दिसते आहे. अशी समानता कोणाला अभिप्रेत असलेली हवी, कोणी त्या करीता मागणी केली, गरज का निर्माण झाली या प्रश्नाच्या मुळाशी कोणी जात नाही. हल्ली तर असा आव आणला जातो की झाले हे खूपच झाले, बोट धरायला दिले आणि आता या डोक्यावरच बसल्या, ट्रेन मध्ये आधी एक डबा अर्धा वेळ, मग दीड डबा पूर्ण वेळ, आता तर काय ...