माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
खरं सांगायचं तर मी स्वतः माझे सख्खे आजोबा पाहिलेही नाहीत त्यामुळे आमच्याशी कडक शिस्तीत वागणारे माझे बाबा माझ्या भाचे कंपनीचे खूप लाड करताना पाहते तेव्हा मला नेहमी वाटतं की आजोबा प्रकार काय असतो आपल्याला खरंच कळत नाही. त्यादिवशी औट घटकेसाठी का होईना एक आजोबा भेटले आणि पटलं की गोरा असो का भारतीय, पैलतीर दिसु लागलेल्या माणसाच्या ओठी प्रेमाचीच भाषा येणार...