बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
स्पीडोमीटरचा काटा कनफ्यूज झाला होता. १२० अणि १२५ - दोन्हीच्या खुणा त्याला आपल्याकडे ओढत होत्या. जीप धड्डाधड ३-४ फूट उंच उड्या मारतच पुढे जात होती. गोळ्यांचे सूं सूं आवाज जीपच्या भसाड्या आवाजालासुध्दा चिरुन जात होते. मेंदूच्या सूचनांबरहुकुम मी अधे मधे खाली वाकत होतो. नेमके तेव्हाच मागून येणारी एखादी गोळी जीपच्या आधीच फुटलेल्या समोरच्या काचेतून आरपार जात होती. मागे एक नजर टाकली पण धूळीत नीट काहीच दिसत नव्हते, साधारण १०-१५ गाड्या तरी मागावर असाव्यात. वाळवंटात रस्ता असा नसल्याने, दूरचा तो अंधुक पांढरा ठिपका नजरेआड न होउ देता त्यादिशेने मी जीप ...