बहुधा पूर्वी पाद्रीलोकांना आपल्या बाटवाबाटवीच्या प्रयोगांसाठी पावट्यांइतके सोपे लक्ष्य मिळत नसावे. आणि म्हणूनच ते असे अधिकाधिक पावटे मिळण्याच्या सदैव मागावर असावेत आणि एखादा पावटा सापडण्याच्या सदैव प्रतीक्षेत असावेत. त्यातून होणाऱ्या 'दिसला पावटा की टाकला विहिरीत पाव'सारख्या प्रकारांतून '(विहिरीत पाव टाकायला) पाद्र्याला पावट्याचे निमित्त(च हवे असते)' असा वाक्प्रचार उद्भवला असावा.

किंबहुना 'पाव'ट्यामधील 'पावा'चाही हाच उगम असावा का, यावर तज्ज्ञांत मतभेद आहेत असे कळते.