माझ्या मुद्द्याला पूर्णपणे बगल देणारा प्रतिसाद! एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी काही प्रतीकात्मक कल्पना राबवावी लागते. त्याच त्याच शर्टाचा वास घेणे आणि रोज एकच पापलेट दाबून पाहणे ह्या गोष्टी सिम्बॉलिक म्हणून दाखवल्या आहेत. एखादा माणूस रोजरोज अगदी तेच करीत नाही, पण तसेच काहीतरी करत असतो. फक्त विन्डो शॉपिंग करणारी आणि मुंबईच्या मच्छीबाजारांतून नुसताच माशांचा वास घेत भावाची चौकशी करत फिरणारी अनेक मराठी माणसे तुम्हाला प्रत्यही दिसतील. असले वास्तव कबूल करायची लाज वाटणारच. म्हणून वरील अवान्तराबद्दल आश्चर्य वाटले नाही.
माझ्या आठवणीतला एक गृहस्थ रोज एका ठरावीक दुकानात जाऊन 'ओवल्टिन'ची चौकशी करत असे. त्या काळात ओव्हलटिन अत्यंत दुर्मीळ असल्याने मिळणार नाही ही खात्री होती. तरी त्या बहाण्याने त्या फॅन्सी दुकानाला रोज भेट देता यायची. दोन तीन महिने गेले आणि खरेच त्या दुकानदाराने ओव्हलटिनचा डबा समोर ठेवला. गृहस्थांनी किंमत विचारली आणि उद्या घेऊन जातो असे सांगून ते दुकान कायमचे सोडले. आजही 'राउन्ड ट्री' कंपनीचा आयताकार चपटा उभा पत्र्याचा कोकोचा डबा आहे का अशी चौकशी करत एखादा माणूस मॉलांना नक्की भेट देत असेल. सापडला की लिहीन!
'मी शिवाजीराजे बोलतोय'मधील प्रसंग काल्पनिक असला तरी असंभाव्य नाही.