महेश, मृदुला, मीराताई, राधा आणि इतर होम्सप्रेमी मनोगती,
आपण प्रत्येक आठवड्यात एक अशी होम्सची कथा घेवुन त्यावर चर्चा करु या. सुरवातीला छोट्या गोष्टी घेवुन त्यावर चर्चा करु या. ( एकुण ५ खंडातील ५६ गोष्टी आहेत.)
ज्यांनी अजुनही होम्स वाचलेला नाही, परन्तु वाचण्याची आवड आहे, त्या सर्वांनी होम्सचे पुर्ण खंड विकत घ्यावा. ( अंदाजे मुल्य १५० ते २०० रु. असेल.) आमच्याबरोबर वाचन आणि चर्चा केली तर हे वर्ष खुपच सुंदर असेल याची मला खात्री वाटते.
उद्या या आठवड्याची गोष्ट ठरवु या तर....
त्याही अगोदर, कोणी मला होम्समधील आवडते कथानके, प्रसंग, संवाद यावर आठवेल तसे लिहले तर चर्चा साठी योग्य वातावरण निर्मिती होईल याची मला खात्री वाटते. ( जसे आज राधाताईनी तरुण शेरलॉक होम्सवर इतरत्र लिहले आहे.)
तर चला करु या सुरवात...
द्वारकानाथ.