हिंदीत नुक्तावाल्या क़, ख़, ग़, ज़ चे उच्चार वैकल्पिक आहेत. आणि लिखाण? म्हणजे फ़, ड़, ढ़ चे वैकल्पिक नाहीत? तसे असेलही कदाचित. पण आपण इथे फ़क़त लिखाण पाहू शकतो, उच्चार ऐकणे शक्य नाही.
मराठीतही आपण च,ज़,झ,फ़ चे दन्त्यतालव्य आणि दन्त्योष्ठ्य उच्चार करतो, पण लिखाणात दाखवत नाही; डावा आणि वाड़ा यांतल्या 'डा'चेसुद्धा भिन्न उच्चार करतो. तसे काहीसे असू शकते. तत्कारणें, नुक्तावाल्या अक्षरांचे उच्चार वैकल्पिक आहेत, असे एखाद्या आधुनिक ख्यातनाम वैयाकरण्याचे मत वाचायला मिळाले तर बरे वाटेल. आंतरजालावर कुठे सापडले तर दुवा द्यावा, मीही त्याबद्दल दुवा देईन. तोपर्यंत तुमचे मत स्वीकारार्ह!