मिंग्लिश हझल आवडली. पण काही द्विपदींमध्ये - जसे लास वेगास, नायगारा इ. - दोन ओळींचा परस्परसंबंध अधिक स्पष्ट व्हायला हवा होता असे मला वाटते. वृत्त पाळण्यासाठी लासचे वेगास वगैरे ठीक; अन्यथा त्याला तसा अर्थ नाही. स्यान होजे ला काय म्हणाल? स्यानचे ओझे/होजे? असो. एकंदर वाचून करमणूक झाली. सकाळी सकाळी कार्यालयात येऊन असे वाचायला मिळायले, जरा हसता आले की फार बरे वाटते. कामाचा ताण हलका होतो.