उत्तर: या दिल की सुनो दुनियावालों... (गायक: हेमंतकुमार)

'माया ना माळ्याच्या डोळ्यां' म्हणजे 'माली की नज़र में प्यार नहीं' हे लगेच कळले, आणि 'बागेत फुले हे फूल कसे' म्हणजे 'यह फूल चमन में कैसा खिला' याचाही अंदाज आला, आणि या ओळी कोठेतरी (आणि बऱ्याच वेळा) ऐकल्या आहेत हेही आठवले, पण तरीही गाण्याच्या मुखड्याशी (आणि चालीशी) काही केल्या संबंध जुळेना. (या ओळींची चाल जरी लक्षात आली असती तरी उत्तर लगेच सुचले असते.) मग गूगलबाबाला 'माली की नज़र में प्यार नहीं' एवढेच सांगून पाचारण केल्यावर उत्तर मिळाले (आणि पटले - आणि चालही आठवली).

(गूगलबाबाने 'साली की नज़र में प्यार नहीं' असा - 'ह्यावरून आठवलं' छाप - पर्यायही दिला, असे जाताजाता कळवावेसे वाटते.)