मराठीतही आपण च,ज़,झ,फ़ चे दन्त्यतालव्य आणि दन्त्योष्ठ्य उच्चार करतो, पण लिखाणात दाखवत नाही; डावा आणि वाड़ा यांतल्या 'डा'चेसुद्धा भिन्‍न उच्चार करतो. तसे काहीसे असू शकते. तत्कारणें, नुक्तावाल्या अक्षरांचे उच्चार वैकल्पिक आहेत, असे एखाद्या आधुनिक ख्यातनाम वैयाकरण्याचे मत वाचायला मिळाले तर बरे वाटेल.
ह्याबाबत एखाद्या जाणकाराला विचारून सांगतो.

एक दुरुस्ती
आधीच्या प्रतिसादात चुकून डॉ. नामधारी सिंह लिहिले आहे. त्याऐवजी डॉ. नामवर सिंह वाचावे.