सार्वसामान्य लोकंकरता हिंदी ही एक स्ट्रीट लँग्वेज म्हणजे रस्त्यावर बोलण्याची भाषा आहे. ज्याला जरूर वाटेल त्याने ती रस्त्यावर शिकावी आणि तिथेच वापरावी. हिंदी भाषेवर उपजीविका करणारा एक मोठा वर्ग म्हणजे सिनेमातले तारे. पण सिनेमाच्या बाहेर, स्टेजवर, बक्षिसे स्वीकारताना हे लोकही इंग्रजीच झाडतात. एकंदरीत हिंदीविषयी एक न्यूनगंड आहे. तो लक्षात घेता, हिंदीला फार मान द्यायला नको. हिंदी जिवंत ठेवायला बिहार, उप्र, मप्र इथे महाप्रचंड संख्येने लोक आहेत. ते बघून घेतील. मराठी लोकांनी अस्मिता म्हणून मराठी आणि पोटापाण्याकरता इंग्रजी एवढेच शिकलेले पुरेसे आहे. हिंदी जबरदस्तीने डोक्यावर लादून घ्यायची काहीही गरज नाही.
इंग्रजी हा ज्ञानाचा महासागर आहे. त्याचे निदान दोनचार शिंतोडे अंगावर उडाले तर फायदाच आहे. हिंदी हे ज्ञान, साहित्य या बाबतीत मराठीपेक्षा फार वरचे नाही. त्यामुळे त्याचे स्तोम माजवू नये. सिनेमे पहायला, कधी उत्तरेत प्रवास केला तर तिथे बोलायला रस्त्यावर जेवढे हिंदी शिकले जाते ते पुरेसे आहे.