ह्या अस्तित्वाची निर्मिती कशी झाली याला एकमेव आणि अत्यंत अलौकिक उत्तर अष्टावक्रानी आपल्या गीतेत दिले आहे. तो म्हणतो ह्याची सुरुवात झालेली नाही हे सुरुवाती पासून असेच आहे. - हे असेच आहे, पण का आहे? ह्या प्रश्नाला उत्तर नसेल तर माझ्या दृष्टिने कशालाच काही अर्थ राहात नाही. निराकाराचे स्वरूप नाही समजले तरी काय फरक पडतो? मुक्ती नाही मिळाली तरी काय फरक पडतो? जे आहे ते तसही इथेच राहणार आहे. ह्या सगळ्या खटाटोपाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. ऑल धिस शुड बी सर्व्हिंग अ पर्पज...

चमत्कार ही हातचलाखी आहे.  - खरच? मला वाटायचं की पंच महाभूतांवर प्रभुत्व वगैरे असलं की हे साधू लोक कशातूनही काहीही निर्माण करू शकतात किंवा काहीही करू शकतात. सामान्य माणसाला घडलेल्या गोष्टीचं आकलन होऊ शकत नाही म्हणून ते त्याला चमत्कार म्हणतात एव्हढच.