विजय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि याला शास्त्रीय आधार पण आहे.  मागच्या दहा पंधरा वर्षात न्यूरॉलॉजीच्या क्षेत्रात झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कॉग्निटिव्ह कपॅबिलिटी असणारा माणसाच्या मेंदूचा भाग पुरुषांपेक्षा स्त्रियांमधला जास्त कार्यक्षम असतो.  म्हणूनच त्या एखाद्या गोष्टीचा विचार पुरुषांपेक्षा जास्त सर्वंकष करू शकतात  आणि म्हणूनच धोके ओळखण्याची आणि त्यांचा अंदाज घेण्याची (रिस्क कॅलक्युलेशनची) त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा चांगली असते.  याअंतर्गतच आणखी एक म्हणजे समोरच्या माणसाला पारखण्यातही त्या जास्त हुशार असतात.  (अवांतर : रावले साहेब आत्ता कळलं लेडीज बॉस असेल तर तुमची नोकरी का जाते ते!! ह. घ्या.)  दुसरं म्हणजे भावनिक संबंध जोपासणारं माणसाच्या मेंदूतलं केंद्रही स्त्रियांच्या मेंदूतलं जास्त कार्यक्षम असतं. पुरुष जास्त रॅशनल असतात आणि म्हणूनच स्त्रियांपेक्षा जास्त बेधडक पण असतात.