कोणतेही एकच घ्याल तर दुसरे अपुरे पडेल.
उदाः
१.अपत्य होणे / संतती होणे : हे साध्य / लक्ष्य सन्मुखता. वा प्रॉडक्ट / रिझल्ट ओरिएंटेशन.
२. अपत्य हे सुबक, सुंदर, निरोगी, दिर्घायू, बुद्धिमान, सद्गूणी व म्हणून "भावी लक्ष्मी पुत्र" बनवणे [ मातेच्या पोटात असल्यापासून ] हे साधना / साधन सन्मुखता. वा प्रोसेस ओरिएंटेशन.
दोन्हीचे यथायोग्य परीक्षण [प्रॉडक्ट / प्रोसेस इव्हॅल्यूएशन] व्हावेच.
आता मला कोणीही सांगा, यात कोणते "एकच" पुर्णत्वाकडे नेते?
म्हणून एक आत्मा व दुसरे शरीर दोन्ही परस्पर पूरक.
उर्जा व पदार्थ, गुरू व शिष्य, माता व पिता............. देव व भक्त........
दोघांनीही फक्त स्थळ काळ वेळाचे भान / अवधान ठेवावेच.
एकाच वेळी दोघेही एकाच शिखरावर नाही राहू शकणार.
कधी [टाईम] आणि कुठे [स्पेस] या दोनच गोष्टींच्या एकमतावर दोघांचा जिवनप्रवास सुरळीत राहू शकतो.
पटतेय ना?
धन्यवाद !