हा लेख चांगला आहे.

या लेखातील विचार अनेक जणांना जाणवू शकतात. मलाही जाणवत राहतात व राहिलेले आहेत.

तरीही हा लेख चांगला झालाच आहे.

विविध माणसांवर अश्या विचारांच्या तीव्रतेचे विविध परिणाम होतात असे वाटते.

ज्याला अजिबात मान्य नाही तो हसेल व नेहमीप्रमाणे जगत राहील. ज्याला प्रचंड तीव्रतेने जाणवेल तो संत होईल.

काहीकाही लोक शास्त्रज्ञ, कवी, चित्रकार, योद्धे होऊ शकतात.

( अर्थातच, याचा अर्थ असा नाही की असे सर्वच लोक याच भावनेतून तसे होतात. )

हे विचार जास्तीतजास्त लोकांना पटवत राहण्यासाठी कार्यरत राहणे हे, हा लेख पटलेल्यांनी स्वतःचे कर्तव्य मानायला हवे असे वाटते.

मी माझ्या कविता / गझलांमधून वारंवार आयुष्याच्या , स्वतःला काहीतरी समजण्याच्या निरर्थकपणावर लिहित असतो.

मोह आवरत नाही असे नाही, पण मुद्याच्या पुष्ट्यर्थ काही शेर देत आहे.

१. हा पसारा पाहिला की वाटते .... काय आहे चाललेले आपले

२. यमाचा वेगळा, ज्ञानेश्वरांचा वेगळा रेडा ... तसा होतोस मित्रा तू जसा लाभेल रंगारी

३. भव्य तारा शोधला कोणी जसा ... भान थोडे क्षुद्रतेच वाढले

४. मी आहे, जग आहे, हेही भरपुर आहे, ... दोघे नसतो, काय न जाणे केले असते!

५. मी उभा की आडवा हे पाहुनी ठरते दिशा ... भिन्न तरणोपाय आहे काय अवकाशाकडे?

निरर्थकपणा ( व्यक्तिमत्वाचा ) लोकांवर ठसवणे व हे जे काही जगणे आहे याच्यापलीकडे जे आहे त्याचे दर्शन वाचकांना सतत देत राहणे ( अर्थातच आपले ज्ञान, अनुभव, संस्कार, भोवतीची परिस्थिती, क्षमता, प्रतिभा, इच्छा वगैरेंना अनुसरून ) हे माझ्यामते कवीचे एकमेव काम आहे असे समजले पाहिजे.