स्मृति येथे हे वाचायला मिळाले:


मामा! हो, आनंदमय मूर्ती, माझे वडिल. देखणे व्यक्तिमत्त्व, गौरवर्ण, सुवर्णकांती, विशाल भाल, हारसे निळेशार घारे डोळे. पाहिल्यावर कोणालाही आदरयुक्त आपुलकी वाटावी. लहान मुलांवर तर फार प्रेम. श्रीकृष्णाने घाबरलेल्या दिग्मुढ अर्जुनाला रथारूठ असताना रणांगणात गीता सांगितली, तशी या बालकृष्णाने संसारात राहून, गीता आत्मसात करून, पदोपदी मला ती अनुभवायला लावली. सर्व काही कृष्णार्पण करावे, आपल्याकडे कोणत्याही कर्माचा कर्तेपणा घेऊ नये हे सांगितले. संसारात राहून, तीर्थातील बिल्वपत्राप्रमाणे त्यातील एक सुद्धा दव बिंदू त्यांनी आपल्या अंगास लागू दिला नाही. ...
पुढे वाचा. : तीर्थस्वरूप मामा