आज चंदा भिकारी असे गावची
मारती पोरटी हासुनीया खडे
ती न माणूस, केवळ असे देह तो
भोगतो भोग, निर्जीव होता, पडे

समस्येचे विदारक चित्रण केले आहे तुम्ही.

जुन्या पद्धतीची रे. टिळक शैलीची आठवण झाली. अशा पद्धतीची कविता हल्ली दिसत नाही. तुमची वृत्तावर पकड जबरदस्त आहे. इतक्या झपाट्याने इतकी लांब वृत्तबद्ध रचना करणे सोपे नाही. शिवाय शब्दांचीही ओढाताण नाही.

एवढी कविता लिहायला किती वेळ लागला ते कळेल का?

कविता योग्य वाटली. (आनंद वाटला असे कविताविषयामुळे म्हणवत नाही.)

शुभेच्छा

-श्री. सर. (दोन्ही)