एकदा ताप मामास आला जरा
तो म्हणे आज कामास तू जा मुली
रोजगारावरी आपली भाकरी
घाम गाळून पेटायच्या या चुलीआणि चंदा जशी पोचली त्यातिथे
पाटलाने तिला पाहिले, भाळला
कोण, तू कोठली, माहिती काढली
बोलताना तिचा देह न्याहाळला
बिनचूक वृत्त आणि/तरीही सोप्या ओळी आणि/तरीही सकस यमके ह्यांचे उदाहरण म्हणून या कवितेकडे नक्कीच पाहता येईल. (चार 'र' गणांचे हे वृत्त कोणते?)