निराकार हाच सगळ्या आकाराचा आधार आहे. आपण सध्या शरीरात असल्यामुळे मन आणि शरीर म्हणून चल आहोत पण निराकार जाणवल्यावर आपले अचल परिमाण उपलब्द्ध होते. अस्तित्व आकार आणि निराकार दोन्ही मिळून आहे.
इथे मला ऐक सुंदर झेन कथा सांगाविशी वाटते. ऐक साधक आपल्या झेन गुरू (बोकुजू) ला विचारतो 'मास्टर आम्ही रोज कपडे बदलतो, खातो, झोपतो, यातून बाहेर कसे पडणार? त्यावर बोकुजू म्हणतो कपडे बदला, खा आणि झोपा! त्या शिष्याला उलगडा होत नाही. बोकुजूचं उत्तर किती साधं आहे. त्याचं म्हणण आहे : कपडे बदलणं, खाणं, झोपणं हे घडतं आहे आणि समजतं आहे, सगळ्याचा आधार निराकार आहे त्यामुळे बाहेर कोण पडणार?
हेच कृष्ण अर्जुनाला सांगतोय, युद्ध आहे पण मरत कोणी नाही, आकार नाहीसा होतो आणि तुम्ही जो पर्यंत स्वतःला आकारच मानता तोपर्यंत मृत्यू आहे, निराकाराचा बोध होता क्षणी कळेल की आकाराच्या आत निराकार आहे, तो अजन्मा आहे, तो कसा मरेल? आध्यत्म म्हणून तर अमृताचा शोध आहे. अमृत हे काही पेय नाही ते तुमचे आता या क्षणी असलेले मूळ स्वरुप आहे.
अस्तित्व अत्यंत रमणिय आणि अर्थपूर्ण आहे. उत्तरासाठी हा दुवा बघावा
संजय