माया ना माळ्याच्या डोळ्यां'... चाल थोडी अवघड वाटते.

नाही हो. खरे तर ही ओळ अगदी मस्त गागा गागा गागा गागा चालीत बसते की !


शकलात हवे ते ना देऊ
जे दिलेत ते मज साहू द्या
।२।....  

पहील्या ओळीत अर्थ बदलला आहे. 'शकलात' ऐवजी 'शकलो' हवं आणि दुसऱ्या ओळीत 'साहू' ऐवजी 'सोसू' हवं असं मला आपलं वाटते  (शकलो हवे ते ना देऊ, जे तुम्ही दिले ते सोसू द्या)

सोसू द्या हे भाषांतर ठीक आहे; पण यमक सगळीकडे .... आहू द्या असे आहे त्यामुळे साहू द्या हे निवडले. (सहन करू द्या असे)


मला मिळालेल्या गाण्यात तुम्ही म्हणता तसा अर्थ होत नाही. मला जे हवे होते ते तुम्ही देऊ शकला नाही असा अर्थ होतो. अधिक तपासणी करत आहे.

मनापासून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असाच लोभ राहू द्या.