सुर्यमालिका ही व्यक्त गोष्ट आहे, डॉप्लर इफेक्टनी सृष्टीच्या प्रसरणाचा सिद्धांत मांडला तरी ज्यात हे प्रसरण होते आहे ते निराकार (व्हॉइड) कुठेही संपत नाही, ते कसे प्रसरण पावणार आणि कश्यात प्रसरण पावणार? जर ते अनिर्मित आहे तर त्याला वेळ कशी बांधेल? वेळ निराकारात निर्माण होणाऱ्या आकारांना लागू आहे.

वेळ निराकारात आहे पण निराकार वेळेच्या बाहेर आहे. वेळेची अनेक परिमाण असू शकतील, त्याला आपण युगं म्हणतो पण ती आकाराच्या प्रकटी करण आणि लयीशी संबंधीत आहेत, निराकार अकाल आहे. म्हणून तर नानक शीख धर्मीयांना 'सत श्री अकाल' अशी शिकवण देतात. कालरहितता हा नानकाचा निराकाराकडे बघण्याचा दृष्टीकोण आहे.                                             संजय