१९७५-९५ पर्यंतच्या कालखंडात काही विशिष्ट हिंदी-मराठी चित्रपटांच्या पटकथा शोभावीत तशी ही कवितारूपी कथा/चित्रपट वाटली/ला. त्यातील नायिका अशाच बिचाऱ्या, दुर्दैवी असत/दाखवत. भडक, अंगावर येणारी कविता असली तरी बरेचदा अशाच अप्रिय गोष्टी आसपास घडत असतात, हेही खरेच. कवितेचे माध्यम, अगदी सहज आलेल्या वृत्तबद्ध ओळी ही नक्कीच जमेची बाजू म्हणता येईल.