शाळेत म्हणाव्यात तितक्या सहज सोप्या ओळी आणि चाल आहे त्यामुळे अशा निरगस चालीच्या ओळीतून अशी संतापजनक घटना जशी घडली तशी सांगणे हे जास्त स्पष्ट/ठळक वाटत आहे, असे मला वाटते. कवीचे स्वतःचे शब्द फार कमी आहेत (गरीब बिचारी, असे इतपतच..) कवी कुठेही इन्व्होल्व्ह झालेला नाही, किंवा काही टिप्प्णीही करत नाही. थंडपणे घटना सांगत आहे असे वाटले. ब्लॅक कॉमेडी किंवा तत्समप्रकारात असते तसे. त्यामुळे जास्त परिणामकारक वाटली.