......

फिरत्या रंगमंचावर जसे तीन-चार वेगवेगळे सेटस लावून ठेवलेले असतात, तसेच नेपथ्य केले गेले आहे. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात लखोबा लोखंडे जसा कधी तंबाखूचा व्यापारी, तर कधी नौदल अधिकारी, कधी एखादा बुवा तर कधी एक सुसभ्य मध्यमवर्गीय सद्गृहस्थ म्हणून वेगवेगळ्या सेटसवर अवतरतो, तशी बरीच पात्रे या नाटकात आहेत. ही पात्रे काम करीत आहेत ते नाटक मात्र आहे, ‘तो मीच आहे! ’ या नावाचे. शरद पवार, चंद्राबाबू, नितीशकुमार, इतकेच काय लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान आणि दशावतारी अमरसिंगसुद्धा या फिरत्या रंगमंचावर इतक्या चपळाईने फिरत आहेत, की प्रभाकर पणशीकर वा ‘सही रे सही’मधले भरत जाधवही थक्क व्हावेत. राष्ट्रीय रंगमंचावरील या सर्व पात्रांना एकत्र आणून एक अभिनव ‘थिएटर वर्कशॉप’ विजया मेहता किंवा वामन केंद्रे घेऊ शकतील. त्या कार्यशाळेचा उपयोग देशातील राजकारणाची संहिता लिहायला आणि विविध बहुपात्री वा एकपात्री नाटके बसवायला होऊ शकेल. एकच पात्र त्याच नाटकात नायक, खलनायक, उपनायक, लोकनायक आणि सूत्रधार म्हणूनही कसे काम करू शकते, हे रंगकर्मी मंडळी शरद पवार, अमरसिंग इत्यादींकडून शिकू शकतील.

.......

मुळातूनच वाचा : तिसरी घंटा (लोकसत्तेचा अग्रलेख)