विषयाची मांडणी आवडली. आपण मांडलेल्या खालील तीन मुद्द्यांवरील माझे विचार , ते कदाचित या लेखनाच्या पार्श्वभूमीवर अयोग्य ठरणारे असतील, असे आहेत :
निराकाराला विसर पडतो - निराकाराला आठव किंवा विसर कांहीच नाही. केवळ अस्तित्व आहे. लक्ष्य जेव्हा बहिर्गामी होते, तेव्हा निराकार झाकोळले जाते, जसे कापडावर चित्र रंगविले गेले की चित्रच तेव्हढे चित्त वेधून घेत राहाते. कापडाला त्या चित्राशी काहीच देणे घेणे नसते.
यासाठी फक्त एकच करा-समोर बघा, बस्स! - जोपर्यंत डोळे, कान उघडे आहेत, तोपर्यंत लक्ष्य अस्थिर राहाणारे असते. म्हणून दृक-श्राव्याशी असलेला मनाचा संपर्क थांबला पाहिजे. ही क्रिया साधणे जमले पाहिजे. डोळे बंद ठेवून ही क्रिया सुकर होते. निराकार ही संकल्पना मनात रुजावयास हवी. ती एकदा रुजली की, निराकाराशी अनुसंधान अखंड राहाणारे असते; डोळे उघडे वा बंद असणे याला मग महत्व उरत नाही. मग पुढचे व्यवहार क्लिष्ट होणे संपते.
ज्या क्षणी पडदा दिसतो त्या क्षणी चित्रपटाचा परिणाम शून्य होतो: मनावर होणारा परिणाम अवलंबून असतो, तो मनाच्या हळवेपणावर. हे हळवेपण संपावयास हवे.