१) 'निराकाराला आठव किंवा विसर कांहीच नाही'. आगदी बरोबर. तुम्हाला आपल्या निराकार स्वरुपाचा विसर पडतो. याचाच दुसऱ्याबाजूने विचार करा. तुम्ही मुळात निराकार आहात, म्हणजेच निराकाराला लक्ष्य वेधले गेल्यामुळे स्वतःचा विसर पडतो आणि व्यक्तिमत्व तयार होऊ लागते. म्हणून तर सेल्फ-रिमेमबरिंग (स्व-स्मरण) ही जागरुकता समजली जाते.

२) जोपर्यंत डोळे, कान उघडे आहेत, तोपर्यंत लक्ष्य अस्थिर राहाणारे असते. म्हणून दृक-श्राव्याशी असलेला मनाचा संपर्क थांबला पाहिजे

नाही! मनच दृक-श्राव्य आहे. तुमचा मनाशी संपर्क थांबायला हवा.

 तुम्ही डोळे बंद केले की चित्रपटगृहाचे पडडे बंद व्हावे तसा मनाचा दृक-श्राव्य आणखी परिणामकारक होतो (म्हणून तर जाग येई पर्यंत स्वप्न खरे वाटते) त्यामुळे डोळे उघडे ठेवून समोर बघा. याला सजगता (अवेअरनेस) म्हंटले आहे. या प्रक्रियेमुळे तुम्ही एका क्षणात मनाच्या चल्-चित्रपटा पासून मोकळे होता (आता या क्षणी प्रयोग करून बघा).

३) मनावर होणारा परिणाम अवलंबून असतो, तो मनाच्या हळवेपणावर. नाही! मनावर  होणारा परिणाम अवलंबून असतो स्व-विस्मरणा वर. तुमच्या मनाशी जोडले जाण्यावर. जेंव्हा निराकार (म्हणजे तुम्ही) स्वतः ला विसरता तेंव्हा मन तुमच्यावर प्रभाव गाजवते. निराकार हा या अस्तित्वाचा पडदा आहे त्यामुळे ज्या क्षणी आपण पडदा आहोत, साक्षी आहोत, हे स्मरण होते तेंव्हा प्रसंगाचा परिणाम शून्य होतो, मग तो प्रसंग मानसिक असो की वास्तविक.