'तुम्ही म्हणता की "अस्तित्व अत्यंत रमणीय आणि अर्थपूर्ण आहे. " आणि "सगळे निराकार आहे. "  हि दोन्ही वाक्ये विसंगत नाहीत का??'

मी सगळे निराकार आहे असे म्हणालो नाही. आकार निराकारावर प्रकट होतो, निराकार मूळ आहे, तो चित्रपटाच्या पडद्यासारखा आहे, त्रिमिती सृष्टी, म्हणजे हे सगळे दृश्य जग त्यावर प्रकट आहे त्यामुळे त्याला 'फोर्थ डायमेंन्शन' म्हटले आहे. हा निराकार पोकळ आहे (व्हॉईड) तोच सर्व आकार आतून आणि बाहेरून व्यापून असल्यामुळे आकाराच्या आत जरी आपण आहोत असे वाटले तरी तो केवळ भास आहे. निराकाराला (म्हणजे आपल्याला) आपण शरीरात बंदीवान आहोत असे वाटते याचे कारण आपल्याला आपल्या मूळ स्वरुपाचे म्हणजे निराकाराचे विस्मरण झाले आहे. अध्यात्म ही त्या निराकाराची जाणीव करून देणं आहे. 

अस्तित्व हे त्रिमीती चित्रपटासारखं आकार आणि निराकार मिळून झालं आहे. मी ते रमणीय का म्हणतो याचा दुवा पहिल्या प्रतिसादात दिला आहे.                                        संजय