टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
मी ज्या प्रकारे बेल दाबुन धरली त्यावरूनच आत सिग्नल गेला की स्वारीचे काहीतरी सॉलीड बिनसले आहे ! मग आत गेल्यावर लाडोबा आणि दिवट्या असा मुलांचा उद्धार न झाल्याने त्यावर शिक्का-मोर्तब झाले. मी चपला भीरकावल्या, डबा काढुन हीच्या हातात दिला व विस्कटल्याप्रमाणे खुर्चीवर पसरलो. “तू म्हणतेस ते आज पटले, अगदी कोणा-कोणावर सुद्धा उपकार करू नयेत, कातरलेल्या अंगठ्यावर मुतु सुद्धा नये. स्वार्थी बनले पाहीजे, रेस्ट न्यु वे चे स्वामी सांगत त्या अर्थाने नाही, लौकिक अर्थाने, अप्पलपोटी बनले पाहीजे !” मग कपडे बदलले, आंघोळ करून फ़्रेश झालो, जरा विसावलो तेव्हा मंडळी ...