जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
अखेर आज १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला. देशभरात, महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईत अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागले. देशात कॉंग्रेस किंवा भाजप यांना स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू लोकसभा अस्तीत्वात येईल आणि सरकार स्थापन करण्यासाठी घोडेबाजार व सौदेबाजीला मोठ्या प्रमाणात ऊत येईल, पंतप्रधान कोण या प्रश्नावरून काही दिवस घोळ चालेल, असे वाटत होते. मात्र सर्व प्रसारमाध्यमे, एक्झीट पोल, राजकीय विश्लेषक, पत्रकार, ज्योतिषी आदींचे अंदाज चुकवत सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस-आयला सर्वाधिक जागा मिळाल्या. देशात जवळपास ...