ना. सी. फडके यांच्या 'पहिला पांढरा केस' या लघुनिबंधाची आठवण झाली. "आपल्यावर जी मुलगी प्रेम करील तिचे जे वय ते आपले वय समजावे. " इति नासीफ. केसाच्या रंगावरून माणसाचे वय ठरत नाही तर वय ही मनाची अवस्था आहे, हा त्यांचा मुद्दा होता. पहिला पांढरा केस दिसल्यावर आलेली अस्वस्थता, कापून टाकण्यातला फोलपणा आणि कलप लावण्यातले तोटे लक्षात आल्यावर त्यांना हे तत्त्वज्ञान सुचले होते.
शेवटी असे सगळे आहे. सगळे मनावरच अवलंबून असते नाही का?