घेतला आहेच येथे जन्म तर
काय होते जीवनाचे पाहुया

आज काही काम नाही फारसे
चल स्वतःचा थांगपत्ता लावुया

दाद देण्यासारखे काही निघो
शुद्ध आली, काय लिहिले पाहुया

फारशी घाई कुठे आहे म्हणा?
काळ आला न्यायला की जाउया!.. हे शेर आवडलेत..
-मानस६