हे खो-के नाम युगुल-विडंबकांनो,
शत-शत अभिवादन!
राजकारण व संगीतकारणाप्रमाणेच साहित्यातही, विषेशतः काव्यातही,समविचारी पक्षांच्या युत्या होत आहेत हे पाहून हर्ष झाला. कदाचित हीही काळाची गरज असावी (हीहीही). कारण काव्यातही आता 'ह्या ना त्या' कारणे रगड रणे माजून दगडफेक होऊ लागली आहेत..असो. विस्तार व इतर भयास्तव आवरते घेतो.
या जोड-प्रयत्नातून वाचकवर्गास अनेक अजोड (व काही 'झोड') विडंबने वाचावयास मिळतील अशी खात्री आहे व अशा जोड्या मराठी काव्यासही खचितच आभूषणास्पद (नो पन-ओन्ली फन-इंटेडेड) ठरतील.
'खो-के' हे नावही डो-केबाज आहे.
पु वि शु
जयन्ता५२