रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:
ऊन विचित्र तापल होत. थंडीतल ते दुपारच ऊन नकोस वाटत होत. रविवारी आणि ते पण या उन्हात कॉलेजच तोंड बघायची मेघनाची मुळीच इच्छा नव्हती पण जसलीन बर्याच दिवसांची मागे लागली होती की बाबाच दर्शन घ्यायला म्हणुन ती पाय रेटत डोंगरीच्या पायथ्याशी आली होती. डोंगरीच्या माथ्यावर एक देऊळ होत आणि त्याच्या बाजुला कॉलेज. हा बाबा मात्र डोंगरीच्या पायथ्याशी, कॉलेजच्या मागल्या बाजुला बसत असे. तिथे एक औदुंबराच वृक्ष होत. डोंगरीच्या भोवताली मोहोंजोदाडोच्या अवशेषां सारखे भिंतीचे तुकडे पडलेले होते. बर्याच वर्षांपुर्वी डोंगरीच्या भोवताली भिंत बांधण्याचा उद्योग ...