आजकाल मनोगतावर नवनव्या विडंबकांचा सुळसुळाट झाला आहे. शब्द जोडून काव्य पाडण्यात सराईत असणारे हे लोक विडंबनांचा अतिरेक करत आहे असे वाटते. माफी, खोडसाळ, केसुभाई यांची विडंबने चांगली असत. पण नव्या विडंबनांचे काहीच संदर्भ लागत नाहीत. विडंबकांनी सुसंबद्ध व सार्वजनिक स्वरुपाचे लेखन करावे असे वाटते.
वेळ झाली नेहमीची आपली
या, घसा ओला करूया, खाउया
हेच ते जे चित्र पुर्वी बिघडले
आज मॉडर्न आर्ट त्या संबोधुया