१. हे विडंबन नाही हे माझे मत अजूनही तसेच आहे.

२. दोन दोन लोकप्रिय 'तथाकथित विडंबनकार' ( ? ) एकत्र आल्यावर 'तथाकथित विनोद' करण्याची क्षमता व बुद्धी किमान दुप्पट व्हावी अशी माझी अपेक्षा होती. पण मतल्यातील कवाफींमध्ये 'डुया, डुया' आल्यावर इतरत्र 'ढुया, हुया' घेणे अयोग्य आहे ही माझी अपेक्षा मी गुंडाळली, कारण शेवटी याला विडंबन असेच नाव देण्यात आले आहे तर 'आपण ते गजलेच्या व्याकरणाचेही' विडंबनच मानुयात असे म्हणालो.

३. मुळात, हे असे विनोदी विनोद, माझ्याच काय, कुणाच्याच कविते/गजलेवर करून चार वाचकांनी 'फिदीफिदी' करण्याव्यतिरिक्त कुठला हेतू साध्य होतो हेच मला समजत नाही. कमीतकमी, काल लागलेल्या निवडणुकांच्या निर्णयाचे उल्लेख, वाढती लोकसंख्या, दहशतवाद कशाचातरी समावेश व त्यातून काही ना काही प्रबोधन करता आले असते. सामान्य माणसाला जी एक निराशा आलेली असू शकते ( एकंदर सामाजिक परिस्थितीमुळे ) त्यावर भाष्य करता आले असते.  पण लोन, तारे तोडू, केस ओढू किंवा पोट सुटणे, अनैतिक / विवाहबाह्य संबंध असणे, दारुडा असणे वगैरेच्या पुढे विनोदबुद्धीची झेप जाताना दिसत नाही.

मागेच म्हंटल्याप्रमाणे, मी कायम या अश्या प्रकारच्या 'विडंबनांच्या(? )' विरोधात भूमिका घेत राहणार आहे. छापून येवोत, पटोत, टीका होवो वा काहीही!