तो कुणाचेही अनुकरण करत नाही. त्यामुळे गीता ही गीता आहे, उपनिषदे ही उपनिषदे आहेत, कुराण वेगळ्या पद्धतीने सत्यं मांडते, पातंजली त्यांची पद्धत सांगतात, बुद्ध त्याच्या भाषेत शून्याची उकल करतो, त्यामुळे सत्यं जरी एकच असले आणि सगळ्यांचा निर्देश एकाच गोष्टीकडे असला तरी मार्ग आणि अभिव्यक्ती भिन्न होतात आणि त्यात समन्वय होऊ शकत नाही.

हे विधान न पटण्यासारखे आहे. गीता, उपनिषदे, कुराण आणि बुद्ध तत्त्वज्ञानात एकाच गोष्टीकडे निर्देश आहे हे दिशाभूल करणारे आहे.  भगवद्गीता हे वेदांमधील विधानांवर केलेले भाष्य आहे. भगवद्गीतेत चार वर्ण, भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग यांद्वारे वेदांमधील विधानांना तात्त्विक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट काही उपनिषदांमध्ये वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी या अविद्या आहेत व त्या निम्न दर्जाच्या आहेत असे म्हटले आहे. वेद अपौरुषेय आहेत (त्याचप्रमाणे गीताही देवाच्याच तोंडातून सांगितली गेली आहे.) मात्र उपनिषदांना वेदांचे अपौरुषेयत्त्व आणि सार्वभौमत्त्व मान्य नाही. बुद्धाला कपिलाने सांगितलेल्या सांख्यिकीतील तीन सूत्रांव्यतिरिक्त हे काहीच मान्य नाही.

अनुकरणाबाबतही तुम्ही मांडलेला मुद्दा चुकीचा आहे. भगवद्गीता ही वेद व जैमिनीच्या पूर्व मीमांसेचे केलेले विवेचन आहे. आणि भगवद्गीतेने बुद्ध तत्त्वज्ञानाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. (याचे ठळक उदाहरण म्हणजे दोन व्यक्तींमधील संवाद हे बुद्ध साहित्य आणि गीता या दोहोंचेही वैशिष्ट्य आहे.)

मात्र लेखमाला रोचक आहे यात शंका नाही.