कुणीही काहीही म्हणत असले तरी निराकार आणि आकार मिळून अस्तित्व तयार झाले आहे आणि ते डोळ्यासमोर आहे.
आपल्याला निराकाराच्या विसर पडला आहे आणि ते साऱ्या भीती आणि उद्विग्नतेचे कारण आहे, कारण भीती आणि उद्विग्नता केवळ मनात आहे, निराकार शांत आणि निर्भय आहे. ज्यावेळी आपल्याला मूळ स्वरुपाचा म्हणजे निराकाराचा उलगडा होतो तेव्हा जीवनात शांतता येते हा अध्यत्माचा गाभा आहे.
या जगात कोणताही माणूस, केव्हाही आणि कुठेही ऐकच गोष्ट शोधतो आहे आणि ती म्हणजे आनंद, अध्यात्म त्याचा मार्ग आहे. यात न पटण्या सारखे काय आहे? गीता अर्जुनाच्या विषादातून सुरू होते, बुद्ध राजपुत्र असूनही जीवनातल्या उद्विग्नतेमुळे सत्य शोधतो. उपनिषदे हाच दिलासा ज्याना सत्य उमगले आहे त्यांच्या कडून देतात. आपण जेवढे खोलात जाऊ तेवढी निराकारा सारखी डोळ्यासमोर दिसणारी गोष्ट दिसेनाशी होते म्हणून मी सगळे आजच्या काळाला अनुरूप आणि माणसाच्या बुद्धीची आजची प्रगल्भ स्थिती बघून मांडले आहे एवढेच.
तुम्हाला लेखमाला आवडल्याचे कळवले त्याबद्दल आभार! संजय