शायराचे नाव ज्या शेरात गुंफले तो मक्ता - जो गझलेच्या शेवटी असतो (शेवटचा शेर) - ही व्याख्या जरी बरोबर असली, तरी जयंतरावांनी म्हटल्याप्रमाणे मनोगतावर किंवा इतर ठिकाणी गझलेबद्दल प्रतिसाद देताना गझलेच्या शेवटच्याच शेराला मक्ता म्हणायची (कदाचित चुकीची) सवय शायर आणि प्रतिसादी दोघांनाही आहे. त्यामुळे शेवटच्या शेराला मक्ता म्हणून - मग त्यात शायराचे नाव असो वा नसो - त्यानुसार चर्चा झाल्याची कित्येक उदाहरणे मनोगतावर व इतरत्रही सापाडतील. वरील प्रतिसादातील त्यामुळे आम्ही सर्व (वरचा मानस६ यांचा प्रतिसाद पाहा. ) चर्चा करतांना 'मक्ता' त्याच अर्थाने वापरतो
हे वाक्य त्याचेच एक उदाहरण. जोवर मूळ मुद्दा मक्ता म्हणजे काय, त्याची व्याख्या इ. नाही पण इतर कुठला आहे (जसे प्रस्तुत गझलेत शेरांच्या क्रमातून येणाऱ्या परिणामकारतेबद्दलचा आहे), तोवर व्याख्यादी मुद्दे गौण आहेत, हे नक्की; त्यामुळे त्याबद्दलची खुस्पटे काढणे निरर्थक आहे, असे माझे मत आहे. चर्चेकऱ्यांमध्ये परस्परसमंजसपणा असला की ते मूळ मुद्द्याच्या चर्चेसाठी पुरते. बाकीची टिप्पणी दुर्लक्षित करता येते/करावी.