सनातन प्रभात येथे :
देवघर नेहमी पूर्व-पश्चिम दिशेला असावे. देव्हाऱ्यात देवतांची मांडणी शंकूच्या रचनेत करावी. पूजा करणाऱ्या भक्ताच्या समोर शंकूच्या टोकावर म्हणजेच मध्यभागी श्री गणपती, पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला स्त्रीदेवता व डाव्या हाताला पुरुषदेवता असाव्यात.
यांत कुलदेव व कुलदेवी प्रथम व नंतर उच्च देवता असाव्यात. देव्हाऱ्यात कमीतकमी देव असावेत. जेव्हा लक्ष्मीनारायण यांसारख्या दोन्ही देवता एकत्र असतात तेव्हा त्यातील पुरुष देवता प्रधान मानून त्या गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवाव्यात. संताचे चित्र देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा देवतांचे ठेवावे. ज्यांना गुरू आहेत व जे घरी एकटेच राहतात त्यांनी फक्त गुरूंचे छायाचित्र ठेवावे.
वाचा : देवघराची मांडणी कशी असावी?