आपला मुख्य विषय आणि मुद्दे यांच्याशी मी सहमत आहे. फक्त "विविधतामें एकता" ह्या विषयी एक टिप कराविशी वाटते. आपल्याकडे एव्हढी विविधता आहे आणि ती वाढतेच आहे; विविधतेमध्ये एकता हे देखिल एव्हढ्या अभिमानाने उच्चारले जाते की "विविधतामें एकता" ह्याचा खरा अर्थ लोकांना कळाला आहे की नाही ह्याची शंका येते. "विविधतामें एकता" ह्याचा अर्थ, विविधते मध्ये एकता 'असते' असा नसून, एव्हढी विविधता असून देखिल आपण एक आहोत/ असण्याचा प्रयत्न करतो आहोत, असा आहे  .

त्यामुळे, "विविधतामें एकता, यही भारत की विशेषता! " , ही विशेषता थोडी कमी झाली तरी चालेल