आपला प्रतिसाद माझ्या मूळा मुद्द्याचा थोडक्यात समारोप करणारा वाटतो आहे. त्यासाठीची उदाहरणे आणि स्पष्टीकरण देऊन तुम्ही माझे समारोपाचे मत मांडायचे काम अधिकच सोपे केले आहे. 'एकच मन:स्थिती' हा मुद्दा किंवा ज्याला तुम्ही अट म्हणता हा तुमचा वैयक्तिक मुद्दा/अट/तुम्ही कवी म्हणून घालून घेतलेले बंधन आहे. गझल या काव्यप्रकाराने असे बंधन घातलेलेच नाही. ते नज्म मध्ये असते/दिसते; गझलेत एकंदर मूड स्विंग होणे ही सामान्य बाब आहे; काव्यप्रकारानेच तशी परवानगी दिली आहे. असे असताना तुम्ही एकाच मन:स्थितीची जी अट पाळता ती काव्यप्रकारानेच घातली असल्याने पाळण्यात यावी, असे सरसकट विधान करता येणे शक्य नाही. तुमच्या निवडीबाबत, तुम्ही स्वतःवर घालून घेत असलेल्या बंधनांबाबत कुणी हरकत घेण्याचे काहीच कारण नाही; मात्र तुमची मते/बंधने ही काव्यप्रकाराचीच असे सामान्यीकरण करणे चुकीचे, हे माझे समारोपाचे मत. त्यामुळे शेरांमधून मूड स्विंग दाखवणारे काव्य तुम्हाला वाटले नाही तरी गझलच असणार आहे, हे नक्की.
तेव्हा
आता, जर 'मनस्थितीतील सातत्य ठेवायचेच नाहीये' किंवा 'ठेवले पाहिजे असे काहीही नाही' असा मुद्दा असेल, तर ते स्वातंत्र्य आहेच, पण त्या काव्यप्रकाराला काय म्हणायचे याबाबतही मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य असणार!
या प्रतिवादातून तुम्ही सफरचंदाला संत्रे म्हणणार असाल, तर त्याबद्दल कोणी काय बोलावे? सुज्ञांस सफरचंद कोणते आणि संत्रे कोणते हे सांगायची गरज पडायचीच नाही. अर्थातच ठळक केलेल्या मताशी मी शब्दशः असहमत आहे असे म्हणू शकत नसलो (कारण तुम्ही मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य म्हटले आहे - जे प्रत्येकाला आहेच! ) तरी त्याआडच्या मुद्द्याशी (मी पाळत असलेली एकाच मन:स्थितीची अट न पाळणारे काव्य म्हणजे गझल नाही या मुद्द्याशी) पूर्ण असहमत आहे.
अधिक काही लिहिण्याचे प्रयोजन नाही; तेव्हा येथेच थांबतो. धन्यवाद.