Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
दोनतीन दिवस आळस केला होता. पण आता जाणे भागच होते म्हणून मग आज सकाळीच बँकेत डोकावले. मी लहान असल्यापासूनच ह्या बँकेत आमचे खाते आहे. त्यामुळे जवळ जवळ सगळाच स्टाफ ओळखीचा झालेला. कधी कधी बदल्या होतात पण नवीन आलेलेही लवकरच कस्टमरशी रुळून जात. बऱ्याच सीनिअर सिटीझन्सचाही राबता आहे. स्टाफ हसतमुख व मदतीस तत्पर असल्याने वातावरणही छान असते.