गुजराथी समाज गुजराती भाषेसाठी, लिपी साठी त्यांच्या गरजानुसार बदल करीत आहेत.

'गुजराथी भाषेत किंवा लिपीत बदल करण्याचा कुठलाही प्रयत्‍न गुजराथी समाज करत आहे' असे मी ऐकलेले नाही.  ऊंझा अधिवेशनात मूळ गुजराथी शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ लिहिण्यात बदल करण्याची चर्चा झाली होती. भाषेत किंवा लिपीत बदल करण्यावर झाल्याचे माहीत नाही. गुजराथी लोकांना त्यांची 'गरवी गुजराती' अतिशय प्रिय आहे, तिच्यात किंवा ती ज्या महाजन लिपीत लिहिली जाते, तिच्यातला बदल गुजराथी समाज सहजासहजी स्वीकारणार नाही.  

जुन्या व इतिहास कालीन संस्कृत, अर्धमागधी, पाली तसेच परप्रांतातील हिंदी, कोंकणी व परदेशातील नेपाळी ह्या भाषांचा माझ्या महाराष्ट्रातील नागरीकांशी संबंध तो काय? आपण ह्या भाषांचे व त्या भाषकांचे काही देणे लागतो काय? अर्थात ह्या भाषांचा मराठी भाषक समाजाच्या भल्याशी काय बरे संबंध येतो ते कृपया आपण विषद करावे. 

संस्कृत-अर्धमागधी-पाली या केवळ इतिहासकालीन भाषा नाहीत. त्यांत अजरामर वाङ्‌मय लिहिले गेले आहे, त्यांचे वाचन आणि त्यांचा अभ्यास हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तो सतत चालू राहणार. कोंकणी ही मराठीची पोटभाषा. हिंदी-नेपाळी-भोजपुरी-राजस्थानी या भारतात बोलल्या-लिहिल्या जाणाऱ्या भाषा.  या सर्व देवनागरीत लिहिल्या जातात. मराठी लिपीत बदल केला की मराठी लोकांच्या पुढच्या पिढीला या भाषा वाचता येणार नाहीत. रोमन लिपीत बदल केला की युरोपातली (रशियन सोडून) कुठलीही भाषा शिकणे अवघड होऊन बसेल.

त्यापेक्षा धोका नको म्हणून आपण मराठी लिपीत बदल करण्याऐवजी रोमन लिपीत बदल करू या. त्यात यशस्वी झालो की सावकाश मराठीचा विचार करता येईल.

गुजराथी लिपी गुजराथीखेरीज कुठल्याच भाषेची नाही. तेव्हा तिची आणि मराठी भाषेची तुलना नाही.

मराठी समाजात शुद्धलेखन हा 'गुड हँडरायटींग अधिक स्पेलिंग मिस्टेक रहीत लिखाण' असा काहीसा समजला जातो.

नाही! मराठीत शुद्धलेखन म्हणजे प्रमाण लेखन. हस्ताक्षराचा येथे काही संबंध नाही.

काही बदल 'काय करायचं व कसं करायचं' ह्या प्रक्रीयेत करावे लागतात. ह्या बदलालाचा 'उत्क्रांती' म्हणतात. हे आपण जाणता.

उत्क्रांती हळूहळू आणि आपल्याआपण होत असते. ठरवून आणि प्रक्रिया करून केलेल्या बदलांना उत्क्रांती म्हणत नाहीत. --अद्वैतुल्लाखान