बहुरंगी करमणूक ह्या पुस्तकसंचात म्हणींची वर्णविपर्यस्त रूपे (ऍनॅग्रॅम्स) देऊन म्हणी ओळखायला दिलेल्या असत. ती बहुधा मी सोडवलेली सर्वात पहिली कूट शब्दकोडी.

किशोर मासिकात पूर्वी 'चित्रबोध शब्दशोध' अशा नावाचे शब्दकोडे येत असे. तेही माध्यमिक शाळेत आवडत असे. त्यातली शोधसूत्रे चित्रांच्या स्वरूपात असत.

साधारणतः बारा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेससारखी अग्रगण्य भारतीय इंग्रजी दैनिके रोजची क्रिप्टिक शब्दकोडी कोठल्या ना कोठल्या ब्रिटिश दैनिकातून

बरोबर. मला वाटते टाइम्समधली कोडी लंडन टाइम्समधून घेत असावेत. एक्स्प्रेसमधली कोडी (बहुधा) भारतीय बनावटीची असावीत. ती  तुलनेने किंचित अधिक  सोपी असत.

आयायटीत असताना मी पहिल्यांदा ही कोडी पाहिली. सुरवातीला तर काहीही यायचे नाही. (दुसऱ्या दिवसापर्यंत   ) नंतर नंतर तीन तीन अक्षरी शब्द (इंग्रजी शब्दकोड्यातले सर्वात छोटे) कधी कधी यायला लागले. नंतर फक्त वर्णविपर्यस्त शब्द  यायला लागले. इंग्रजी चालीरीती, नागरी जीवनातले बारकावे इ. माहीत नसल्याने त्याच्यापुढे मजल कधीही गेली नाही. दोन तीन टक्क्यांचा हिशेब अगदी बरोबर आहे. (पुष्कळ विद्यार्थी समूहाने ही कोडी सोडवत असत. )

मात्र त्यानंतर साधी शब्दकोडी आवडेनाशी झाली, हे खरेच.

आयायटी जिमखान्याच्या 'तंत्र' ह्या अनियतकालिकात देण्यासाठी शब्दकोडी तयार करायचा छंद त्यातून लागला. 

अमेरिकेत मात्र अशी (कूट) शब्दकोडी कुठे मिळाली नाहीत.