लिपी जेव्हा निसंदिग्धपणे उच्चार लिहू शकत नाही, तेव्हा त्यात सुधार करणे आवश्यक ठरते. ऍ, ऑ हे आपल्याकडे नसलेले उच्चार लिहीण्याची वेळ आली, तेव्हा हे नवीन स्वर सहजपणे आपण स्वीकारले.

स्वा. सावरकरांनी देवनागरी लिपीत ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या ही लिपी टंकलेखनानुकूल बनवण्यासाठी आहेत. आपल्या लिपीत कोणत्याही प्रकारे कमतरता त्यांना आढळली म्हणून नव्हे. सुमारे ८०-९० वर्षांपूर्वी तो विचार योग्य होता.
परंतू संगणक आणि इतर तंत्रज्ञानाने जी झेप गेल्या काही वर्षांमध्ये घेतली आहे, ती पाहता, त्या सुधारणा प्रचलीत करण्याची आता काही आवश्यकता नाही. एकच अक्षर वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या प्रकारे लिहीले जात असल्याने एकाच अक्षरासाठी एकापेक्षा अधिक खिळ्यांची गरज पडे. वास्तविक पाहता हा लिपीचा दोष नसून तंत्रज्ञानाची मर्यादा होती. ती आता राहीली नाही. सबब, केवळ सावरकर म्हणतात म्हणून लिपीत बदल करणे अनावश्यक आहे.
र्हस्व दीर्घ लिखाण हे भाषेप्रमाणे आहेत, लिपीमुळे नव्हे. जसे बोलावे तसे लिहावे.