स्मिताने म्हटल्याप्रमाणे मी पुस्तक ऐकल. (इबुक नव्हतं तर ऑडीओ बुक उपलब्ध होतं म्हणून) दुवा क्र. १
पुस्तकातील मतं खरच जुळणारी वाटली. भुषण म्हणतात तसं भारतीय स्त्रिच्या बाबतीत असेलही, पण हे पुस्तक लिहिणारा पाश्चिमात्य आहे. तिथेही सगळं असच आहे म्हणजे त्यासाठी स्त्री पुरुष यांच्या विचारसरणीतला फरक हा देश वा संस्कृती / इतिहास याचेशी निगडीत नाही. मला वाटते की हे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतं.
"इंदिरा गांधीं"चा मुद्दा आला त्यावरून मला असं विचरावं वाटतं, की ही मानसिकता १००% पुरुषी किंवा १००% बायकी (योग्य शब्द सुचवा) अशी कोणातच नसावी. हळवे पुरुष आणि कठोर स्त्रिया असही काहीसं विचित्र समीकरण कधिकधी सापडतं. त्यामुळे पुरुषी गुण अधिक असणाऱ्या स्त्रियाही आढळतात.
हे मी एक पुस्तकात वाचलं होतं, पण नाव आठवत नाही.