असामाईक जिवनमुल्ये, असामाईक बोलीभाषा, वर्षानुवर्षे, दशकानुदशके वरचेवर कमी होत चाललेली, सहसंवेदना, 'सहवेदना' अशा बिकट परिस्थितीत, क्षणोक्षणी एकमेकाला जोडणारा, अपरिहार्यपणे सर्वमान्य, सक्तीचा पण सगळ्यांच्या भक्तीस पात्र असा एकमेव धागा मला तरी, रिझर्व बँकेची 'नोट' असेच वाटते.

नोट ही नानाविध सद्गुणे, दुर्गुणे असणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यास 'सर्वगुणसंपन्न' हे सत्यच.

सर्वभारतीयांना एकत्र आणण्यासाठी, कोणत्याही इतर दुव्याला नोटे एवढे महत्त्व प्राप्त करून द्यावे लागेल. तरच तो दुवा सहज सर्वांना एकसुत्रात बांधून ठेवेल.

धन्यवाद.