हा प्रश्न मला कित्येक दिवसांपासून पडला आहे. काँग्रेसला मतदान करणाऱ्यांपैकी सर्वाधिक प्रमाण हे दारिद्र्यरेषेखालिल जनतेचं आहे. त्या पातळीवर भाजपाने फारसं काम कधी केल्याचं मला माहिती नाही. बचतगट, असंघटीत कामगारांसाठी, वयोवृद्धांसाठी, कामगारांसाठी, वगैरे. यामुळे त्यांना अजुनही इंदिरा नगर, जवाहर रोजगार योजना, संजय गांधी निराधार योजना, वगैरे शब्दांचीच ओळख आहे. त्यापलिकडे ते पाहुच शकत नाही. या लोकांमुळे (आणि निवडणुकीच्या आधी वाटल्या जाणाऱ्या १००-५०० च्या नोटांमुळे) यांची मतं हमखास काँग्रेसलाच असतात. काही सुशिक्षित लोकांना भाजपा आवडत असली तरी त्यांच्यात नवचैतन्य उरलेलं नाही. कारण भाजपाने "हिंदुत्व" या शब्दाची इतकी चिरफाड आणि धरसोड केली की कोंग्रेसच्या हाती कोलितच मिळालं. काँग्रेस आणि मिडिया दोघही "भाजपाविरोधी झाले. यावर्षी तर मध्यम वर्गाने फारसं मतदान करणं पसंत केलेलं दिसत नाही. त्याचा परिणाम भाजपाची मतं कमी होण्यात झाला.

भाजपाला बरच काही करावं लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रश्न मांडणं नव्हे तर ते प्रश्न सुटण्यासाठी कार्यकर्त्यांना मदत करणं अपेक्षीत आहे. साधं उदाहरण घ्यायचं तर बचत गटाचं घेता येइल. एका छोट्याश्या प्रश्नाचं उत्तर शोधताना बांग्लादेशाच्या अर्थतज्ञाला "नोबेल" पारितोषिक मिळाले. (चुभुद्याघ्या).

अगदी पहिल्या पायरीवर "अजुनही लोकं काँग्रेसलाच मत देतात" याची खरीखरी कारणं शोधून त्यावर उपाय शोधणे आणि प्रामाणिकपणे अंमलात आणणे हे भाजपासाठी खुप महत्त्वाचं ठरेल. कारण लोकं काँग्रेसला कंटाळले असले तरी भाजपा अद्यापतरी त्यांना समर्थ पर्याय नाही.

अगदी मोफत असेही काही उपाय त्यांना करता येतील ते म्हणजे - प्रौढ शिक्षण, बचत गट, इंग्रजीचे ज्ञान, वेगवेगळ्या अर्जांकरीता मदत, इ. (गरजुंनी संपर्क करावा  )