श्री. भोभेकाकांना,
द्वेषामुळे देश रसातळाला जातो. मान्य आहे. कुठल्याही प्रकारच्या द्वेशाचं समर्थन करणे हे चुकचं. मुळात विषय, ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार हा आहे. ह्या विषयाला अनुसरुन, ब्राम्हणांना नक्की का झोडपता आहेत ? हे जणुन घेणे तितकेच आवश्यक आहे, असे मला वाटले. ह्याबद्दलच्या माझ्या शंका, प्रश्न(इथे नक्की कसे लिहायचे ते सांगा.) , भाग - १ मध्ये मांडलेच आहेत. दुर्देवाने ती चर्चा मध्येच खंडीत झाली. चर्चा / वाद-विवाद व्हावे आणि काहीतरी निश्कर्ष निघावा अशीच माझी इछ्छा आहे.
जे मनोगतावर "उपलब्ध" नाहीत त्यांच्याबद्दल मनोगतावर टिकाटिपण्णी करू नये.
हे वाक्य मी कुठल्या संदर्भात म्हटले आहे ह्याकडे दुर्लक्ष करु नये. प्रतिमा जोशी, हयात आहेत, इतिहास जमा झालेल्या नाहीत. इतिहासावर लिखाण, चर्चा होणारच. त्या होतात म्हणुनच आपल्याला इतिहास जाणता येतो, समजुन घेता येतो व त्यापसुन काही शिकता येते. जाणकार, इतिहासाच विश्लेशण, हाती असलेली माहिती आणि पुराव्या नुसार करतात, त्यातही, वेगवेगळे विचार बाहेर येतात. वाद-विवाद, चर्चा होतातच. प्रतिभा जोशींबद्दल काहीही माहीती नसताना "म.टा. मधील प्रतिमा जोशींच्या लेखातील वरील विधानच त्यांच्या बिनअभ्यासू आणि उथळ विचारांचे प्रतिनिधित्व करते." ही टिका मला, लेखापेक्षा, लेखकावर जास्त वाटली. म्हणूनच माझ ते मत मी मांडले. ह्यादोन्ही मधील फ़रक समजण्या इतके आपण नक्कीच सुज्ञ आहात. असो, माझ्या वाक्यांचा सरसकट अर्थ काढुन, मला मिळत असलेले सल्ले व टोमणे आता काही मला नवीन राहीले नाहीत.
मयुरेश वैद्य.