काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक अपसंख्यांकांना कायम झुकते माप दिले. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
काँग्रेस्ने भरपूर भ्रष्टाचार केला, गुंड पोसले, सर्व खरे आहे. आणि म्हणूनच लोकांना चांगला पर्याय हवा होता. त्या दृष्टीने सर्व भाजपा कडे आशेने पाहत होते.
पण भाजपाने आमची घोर निराशा केली. खरे धर्मनिरपेक्ष राज्य आणण्याऐवजी राममंदिराचा अत्यंत अव्यवहार्य मुद्दा पुढे आणला. बाबरी मशीद पाडायला प्रोत्साहन दिले आणि अतिरेक्यांचे संकट, जे फक्त काश्मीर भागापुरते मर्यादित होते , ते सगळ्या देशावर ओढवून घेतले.
त्याशिवाय अत्यंत ढोंगी राजकारण केले, भ्रष्टाचारात आपण काँग्रेसच्या जराही मागे नाही हे दाखवून दिले. त्यामुळे शेवटी लोकांना काही पर्यायच उरला नाही. नाईलाजाने लोक पुन्हा काँग्रेसकडे वळले. हेच खरे दारुण सत्य आहे.